November 21, 2024

Samrajya Ladha

बाणेर मध्ये होणार ‘रक्षाबंधन शॉपिंग फेस्टिवल’, लहू बालवडकर सोशल वेल्फेअर चा उपक्रम..

पुणे :

बाणेर बालेवाडी मधील नागरिकांसाठी रक्षाबंधनाचे निमित्त साधून ‘रक्षाबंधन शॉपिंग फेस्टिवल’ चे आयोजन लहू बालवडकर सोशल वेल्फेअर च्या सहकार्याने आयोजीत करण्यात आले आहे. १२ आणि १३ ऑगस्ट रोजी बाणेर येथील, कुंदन गार्डन मंगल कार्यालयामध्ये मनसोक्त खरेदी करण्याची संधी परिसरातील नागरीकांना उपलब्ध होत आहे. सकाळी ११ ते रात्री ९.३० पर्यंत हा फेस्टिव्हल सुरू राहील.

शॉपिंग फेस्टिवलच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रातील स्वतःचा व्यवसाय सुरु करणाऱ्या महिला आणि व्यावसायिकांना एकत्र करत लहू बालवाडकर सोशल वेल्फेअर हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. स्थानिक पातळीवरील उद्योगाला प्रोत्साहन देऊन त्यांना हातभार लावण्याचा या मागचा हेतू आहे. तरी नागरिकांनी आपल्या परिवारासह या “रक्षाबंधन शॉपिंग फेस्टिवल” ला भेट द्यावी : युवा नेते लहू बालवडकर

या फेस्टिवल मध्ये नागरिकांसाठी विविध प्रकारचे राख्यांचे स्टॉल, बहिणीला देण्यासाठी रक्षाबंधन गिफ्ट, त्यामध्ये कांजीवरम, पैठणी, फाब्रिक डिझाईनर साड्या, हॅन्डलूम साड्या, पंजाबी सूट्स, कुर्तीज, प्लाझो, वेस्ट्रैन वेअर, रेडी टू वेअर ब्लाऊज, शोभेच्या वस्तू, अगरबत्ती, तोरण, किड्स वेअर, सुगंधी हॅन्डमेड सोप, पेंटिंग, ब्युटी प्रॉडक्ट्स, शोभेच्या वस्तू, ऍरोमॅटिक कॅण्डल्स, हर्बल आणि ऑरगॅनिक प्रॉडक्ट, पेस्ट कंट्रोल, महिला बचत गटांनी तयार केलेल्या दर्जेदार वस्तू, तसेच दैनंदिन वापरातील विविध वस्तूंचे स्टॉल उपलब्ध असणार आहेत. तरी आपल्या परिवारासह या “रक्षाबंधन शॉपिंग फेस्टिवल” ला भेट द्या.