November 21, 2024

Samrajya Ladha

बाणेर येथे महिला बचत गटातील महिलांनी साजरा केला मैत्री दिवस…

बाणेर :

बाणेर येथे अहिल्या आणि सावित्री या बचत गटातील महिलांनी एकत्र येत मैत्री दिवस साजरा केला. दैनंदिन जीवनातील कामातून वेळ काढत या बचत गटातील महिलांनी स्वतः साठी वेळ काढून मोठया उत्साहात मैत्री दिवस साजरा केला. बचत गटाच्या मार्फत महिलांसाठी नेहमी विविध उपक्रम राबविले जातात.

मैत्री ही सगळीकडेच जपली जाते. दि.६ ऑगस्ट रोजी सगळीकडे मैत्री दिन साजरा केला गेला. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात रविवारी मैत्री दिन साजरा केला जातो. सोशल मीडियावरही अनेक कलाकार, मित्र मैत्रिणी, महिला गट, जेष्ठ नागरिक आपल्या जिवलग मित्र- मैत्रिणींना मैत्री दिवसाच्या शुभेच्छा देऊन हाताला बँड बांधून साजरा करतात. काहींनी त्यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत तर काहींनी व्हिडिओ. असाच एक छोटासा उपक्रम पुणे येथील बाणेर या गावात अहिल्या आणि सावित्री महिला बचत गटांनी कामामधील वेळ काढून एक दिवस मैत्रीचा साजरा केला.

अहिल्या आणि सावित्री महिला बचत गटांनी महिलांनी एकत्र येऊन केक कापून सर्व महिलांना शुभेच्छा देऊन हाताला वेगवेगळे प्रकारचे फ्रेंडशिप ब्रँड बांधला आहे. म्हणजे बाई पण भारी देवा प्रमाणे स्वतःसाठी वेळ दिला. या दरम्यान महिलांनी खेळ खेळले, संगीत गाणी, संगीत खुर्च्या, उखाणे, नाव सांगून व्यक्ती ओळखणे असे अनेक गेम खेळण्यात आले. अशा प्रकारे महिलांनी एकत्र येऊन एकमेकींना वेळ देऊन मैत्री दीन साजरा करण्यात आला.