बाणेर :
चतुःश्रृंगी वाहतुक विभाग अंतर्गत मेट्रोचे काम सुरु असून सदर कामाअंतर्गत बाणेर रोडवरील ग्रीन पार्क हॉटेल जंक्शन ते पल्लोड फार्म रोड दरम्यान पोर्टल बिम लॉचींगचे काम करण्यात येणार आहे. सदरचे काम करतेवेळी बाणेर रोडवरील वाहतूक सुरळीत राहणे आवश्यक असल्याने महाराष्ट्र शासन गृह विभाग क्र. एम. व्ही. ए. ०१९६/८७१ / सीआर ३७ / टीआरए २ दिनांक २७/०९/१९९६ चे नोटीफिकेशननुसार मोटार वाहन कायदा कलम ११५ ११६ (१) (ए) (बी). ११६ (४) आणि ११७ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन मी विजयकुमार मगर, पोलीस उप आयुक्त वाहतुक शाखा, पुणे शहर, बाणेर रोडवरील पुणे विद्यापीठ ते बाणेर रोडकडे जाणाऱ्या वाहतूकीमध्ये दि. १२/०८/२०२३ रोजी ००.०१ ते दि. १५/०८/२०२३ रोजी २४.०० वा. पर्यंत खालीलप्रमाणे बदल करीत आहे.
*चतुःशृंगी वाहतूक विभागाअंतर्गत बाणेर रोडवरील हॉटेल ग्रीनपार्क जंक्शन ते महाबळेश्वर हॉटेलकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग
१. पुणे विद्यापीठ चौकाकडून अभिमान श्री. जंक्शन येथून बाणेर कडे जाणाऱ्या वाहनचालकांना बाणेर फाटा चौकामध्ये उजवीकडे वळण घेवून आय.टी.आय. रोडवरील परिहार चौक्, डावीकडे वळण घेवुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे, नागरस रोडवरुन महाबळेश्वर हॉटेलजवळ बाणेर रोडवर येवून इच्छितस्थळी जाता येईल.
२. ग्रीन पार्क हॉटेल चौकामधून डावीकडे वळण घेवून सोमेश्वर मंदिर मार्गे रामनदीवरील पुलानंतर उजवीकडे वळण घेवून पासपोर्ट कार्यालयासमोरुन बाणेर रोडवर येवून इच्छितस्थळी जाता येईल.
More Stories
बालेवाडी येथे स्त्री फाउंडेशनकडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांची सन्मान..
बालेवाडी येथे अमोल बालवडकर फाउंडेशन तर्फे हॅप्पी स्ट्रीट-2024 चे आयोजन…
श्री क्षेत्र बाणेश्वर देवस्थान बाणेर येथे महाशिवरात्र आणि वर्धापन दिन उत्साहात साजरा…