बालेवाडी :
दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना मदत करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या अन्नधान्य संकलन अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून या सामाजिक उपक्रमासाठी प्रल्हादजी सायकर यांनी १ लाख ११ हजार १११ रुपयांचा, तर प्रकाशतात्या बालवडकर यांनी ५१ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.
दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी दोघांनीही सामाजिक बांधिलकी जपत आर्थिक योगदान दिले. त्यांच्या या मदतीमुळे अन्नधान्य संकलन अभियानाला बळ मिळाले असून, समाजातील दानशूर व्यक्तींनीही या उपक्रमात सहभागी व्हावे, असा सकारात्मक संदेश यातून मिळत आहे.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रल्हादजी सायकर आणि प्रकाशतात्या बालवडकर यांचे मनःपूर्वक आभार मानले. सामाजिक जाणिवेतून आणि सेवाभावी वृत्तीने मदतीचा हात पुढे केल्याबद्दल त्यांनी दोघांचेही विशेष कौतुक केले.


More Stories
योगीराज पतसंस्थेकडून दुष्काळग्रस्त भागातील गरीब मुलींच्या लग्नासाठी संपूर्ण भांड्यांचा संसार भेट
चंद्रकांतदादा पाटील यांच्या आवाहनाला कोथरुडकरांचा प्रतिसाद; समुत्कर्षच्या माध्यमातून १० टन धान्याची पहिली खेप रवाना!
भाजपच्या २४x७ पाणीपुरवठा योजनेवर १,६०० कोटींचा खर्च; तरीही ३२% पाणीगळती! मग पुणेकरांवर पाणीकपात कशासाठी? नगरसेवक अमोल बालवडकर आक्रमक