बालेवाडी :
केंद्रीय राज्यमंत्री तथा पुण्याचे लोकप्रिय खासदार मा. श्री. मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त मोरेश्वर बालवडकर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या शिबिराला स्वतः मा. केंद्रीय राज्यमंत्री श्री. मुरलीधर अण्णा मोहोळ आणि महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांनी उपस्थिती लावून शुभेच्छा दिल्या.
या रक्तदान शिबिरात तब्बल १५२ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले. सर्व रक्तदात्यांचे मनःपूर्वक आभार!
याप्रसंगी कोथरूड मंडळाचे अध्यक्ष सचिनजी पाषाणकर , नगरसेविका रोहिणीताई चिमटे, नगरसेविका मयुरीताई कोकाटे, प्रकाशतात्या बालवडकर, लहू बालवडकर, प्रमोद अण्णा निम्हण, गणेश कळमकर, राहुल कोकाटे ,प्रल्हाद सायकर, , उमाताई गाडगीळ, सचिनजी दळवी, अस्मिता करंदीकर, वंदनाताई सिंग, अनिकेत चांदेरे, निकिता माथाडे, शुभाष भोळ ,विजया चांदोरकर,वैदेही बापट, रोहनजी कोकाटे, शिवम बालवडकर, मृणाल गायकवाड, स्मृती जैन, प्राजक्ता देवस्थळी, मृणालिनी दुबळे, रीना रायकर, जागृती विचारे, श्रेयस जाधववार, सोहम मुरकुटे, कौशल टंगसाळी, कृष्णा शर्मा, महेश सुतार, महेश कुंटुरकर, सचिन पाडाळे ,शकिल सलाटी,विकास कामत, पंकज चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
रक्तदान हेच श्रेष्ठ दान! एका रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळू शकते. सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडल सरचिटणीस मोरेश्वर बालवडकर यांनी मनःपूर्वक आभार मानले.



More Stories
*जिद्द, जिंकण्याची उमेद आणि खिलाडूवृत्तीचा जल्लोष! पेरिविंकल बावधनच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे दिमाखात उद्घाटन!*
बालेवाडी येथे मुरलीधर मोहोळ यांच्या जन्मदिवसानिमित्त दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत म्हणून प्रल्हादजी सायकर व प्रकाशतात्या बालवडकर यांच्याकडून धनादेश सुपूर्द
योगीराज पतसंस्थेकडून दुष्काळग्रस्त भागातील गरीब मुलींच्या लग्नासाठी संपूर्ण भांड्यांचा संसार भेट