पिरंगुट :
हात मातीला लागला की मन भक्तीने भरते, कल्पना उंचावते आणि सर्जनशीलतेचा बहर फुलतो… अशा भावनेतून पिरंगुट येथील पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी गणेश मूर्ती बनविण्याचे वर्कशॉप उत्साहात पार पडले.
विद्यार्थ्यांनी शाडू व विविध पर्यावरणपूरक साहित्य वापरून आपल्या कल्पकतेतून देखण्या, आकर्षक आणि आगळ्या-वेगळ्या मूर्ती घडवल्या. “माझा बाप्पा – माझ्या हाताने” ही संकल्पना मुलांच्या डोळ्यांतून आनंद व अभिमानाची चमक घेऊन झळकली. शाळेचे वातावरण “गणपती बाप्पा मोरया” च्या घोषात दुमदुमून गेले.
या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना प्रेरणा व मार्गदर्शन देण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल, संचालिका सौ. रेखा बांदल व कु. शिवानी बांदल यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
शाळेच्या प्राचार्या सौ. आसावरी हंचाटे यांच्या नेतृत्वाखाली,
👉 माध्यमिक विभागप्रमुख सौ. पूनम पांढरे,
👉 प्राथमिक विभागप्रमुख सौ. सना इनामदार,
👉 पूर्व प्राथमिक विभागप्रमुख सौ. पल्लवी नारखेडे
यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच शिवाजी पोतदार सरांचे मार्गदर्शन उपक्रम यशस्वी होण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले.
🌺 या वर्कशॉपमुळे मुलांच्या सृजनशीलतेला नवी दिशा मिळाली, पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची जाणीव वाढली आणि संस्कार व आनंदाचा सुंदर संगम साधला. 🌺


More Stories
बालेवाडीत कचरा समस्येवर मोरेश्वर बालवडकर यांचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन; १५ दिवसांत उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा
नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीचा मेणबत्ती मोर्चा
गायनातून भाव व्यक्त होणे अत्यावश्यक : पं. उपेंद्र भट सोमेश्वर फाउंडेशनतर्फे २४ व्या ‘पुणे आयडॉल- 2026’ स्पर्धेचे उद्घाटन