बाणेर :
गणेशोत्सवाच्या निमित्ताने जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशन आयोजित “पर्यावरणपूरक गणपती बाप्पा मूर्ती कार्यशाळा” लहान मुलांच्या आणि पालकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने माऊली गार्डन, बाणेर येथे पार पडली.
या कार्यशाळेत लहान मुलांनी मोठ्या आनंदाने सहभाग घेतला. शाडू मातीकामाच्या माध्यमातून मुलांनी स्वतःहून गणेशमूर्ती तयार केली. आपल्या हातांनी घडवलेला बाप्पा आम्ही घरी बसवणार असल्याची आनंदाने भावना मुलांनी व्यक्त केली. मुलांच्या या आनंदात पालकांनीही सहभागी होत कार्यशाळेचा आस्वाद घेतला.
या उपक्रमाबाबत आयोजक जयेश मुरकुटे म्हणाले की, “गणेशोत्सव हा आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे. मात्र सण साजरा करताना पर्यावरणाची जपणूक होणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळेच आम्ही ही कार्यशाळा आयोजित केली. आपल्या हातांनी बनवलेली मूर्ती ही फक्त एक कला नाही तर पर्यावरणपूरकतेचा संदेश आहे.”
या उपक्रमामुळे बाणेर परिसरात उत्सवाच्या उत्साहाबरोबरच पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेशही पोहोचला.


More Stories
“उच्च तंत्र की तंत्रमंत्र? अमोल बालवडकरांचा भोंदू खरात सोबत फोटो वरून चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा”
औंध ग्रामदैवत भैरवनाथ महाराज उत्सव ३ मे रोजी; ग्रामसभेत तारीख जाहीर
लहानग्यांच्या स्वप्नांना मिळाले पंख: पेरिविंकल पिरंगुटमध्ये सीनियर केजी ग्रॅज्युएशन डे जल्लोषात साजरा!!!