बाणेर –
बाणेर-बालेवाडी परिसरातील विविध सोसायट्यांमध्ये यंदा श्री गणेशाचे आगमन सोहळे मोठ्या उत्साहात पार पडले. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या वतीने ढोल पथकांचे आयोजन करण्यात आले होते. ढोल-ताशांच्या गजरात व पारंपरिक जल्लोषात नागरिकांनी गणरायाचे स्वागत केले.
या सोहळ्यात युतीका सोसायटी (बाणेर), नंदन प्रोस्पेरा गोल्ड, साई शन्य (बालेवाडी), सेवन एवेन्यू (बालेवाडी), सुप्रीम एसटीडो (बाणेर), ब्लिस एवेन्यू (बालेवाडी), गेटवे सोसायटी (बालेवाडी), मॅजेस्टिक सिग्नेचर टॉवर (बालेवाडी), मधुकर सोसायटी (बालेवाडी), रेगुलस सोसायटी (बालेवाडी) आणि गुरुमाऊली सोसायटी (बाणेर) येथे भव्य स्वागत समारंभ पार पडले.
या कार्यक्रमांना भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडल अध्यक्ष लहू बालवडकर, भाजपा नेते गणेश कळमकर, माजी अध्यक्ष सचिन पाषाणकर, सरचिटणीस सचिन दळवी, मोरेश्वर बालवडकर, अस्मिता करंदीकर, सुभाष भोळ, स्नेहल चौघुले, निकिता माथाडे, जागृती विचारे, रीमा रायकर, लखन कळमकर, निलेश सायकर, श्रेयश जाधवर, शशिकांत बालवडकर, विवेक मेथा, कृष्णा शर्मा, तृप्ती जाधव, सतीश बागल आदी मान्यवर उपस्थित होते.
ढोल-ताशांच्या गजरात झालेल्या या स्वागतामुळे परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले. “गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला. मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून सोसायटींसाठी उपलब्ध करून दिलेल्या ढोल पथकांमुळे गणेश आगमनाचा आनंद द्विगुणित झाल्याचे नागरिकांनी सांगितले.
भविष्यात अशा प्रकारचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम दादांच्या माध्यमातून भाजपा उत्तर मंडल परिसरात आयोजित केले जाणार असून, गणेशोत्सव अधिक मोठ्या जल्लोषात साजरा होणार असल्याचेभाजपा कोथरूड उत्तर मंडल अध्यक्ष लहू बालवडकर यांनी सांगितले.




More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!