बाणेर :
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (बाणेर,बालेवाडी,सुस व म्हाळुंगे) आयोजित सोसायटी अंतर्गत गणेशोत्सव सजावट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा बाणेर येथील २४ के सेरेनो सोसायटी, सूस येथील तीर्थ अविला सोसायटी, म्हाळुंगे येथील वॉटर एज सोसायटी आणि बालेवाडी येथील पारितोष सोसायटी या ठिकाणी श्री बाबुराव चांदेरे साहेब (मा.अध्यक्ष-स्थायी समिती पुणे महानगरपालिका) व श्री राहुलदादा बालवडकर (उपाध्यक्ष-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,पुणे शहर) यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडला.
गणेशोत्सव ही फक्त धार्मिक परंपरा नसून एकत्रितपणाचे, बंधुभावाचे आणि समाजातील एकात्मतेचे प्रतीक आहे. गणरायाच्या मंगलमूर्तीसमोर सर्व रहिवासी एकत्र येऊन श्रद्धा, उत्साह आणि उत्स्फूर्त सहभागाने हा उत्सव साजरा करत आहेत.
या पवित्र पर्वावर समाजातील एकोपा अधिक दृढ व्हावा, रहिवाशांमध्ये आपुलकी आणि सलोखा वृद्धिंगत व्हावा याकरिता या उत्सवाला स्तुत्य उपक्रमाची जोड देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही सोसायटी अंतर्गत गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
गेल्यावर्षी तब्बल 286 सोसायट्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. यंदाच्यावर्षी 310 हून अधिक सोसायट्यांनी या सोसायटी अंतर्गत गणेशोत्सव सजावट स्पर्धेत सहभाग घेतला आहे. गेल्या दोन वर्षांपासून पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष समीर चांदेरे यांच्या संकल्पनेतून ही सोसायटी अंतर्गत गणेशोत्सव सजावट स्पर्धा मोठ्या प्रतिसादात संपन्न होत आहे.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी