बाणेर :
बाणेर परिसरात गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पारंपरिक श्रद्धा व उत्साहात पहिली आरती करण्याचा मान सौ. पूनम विशाल विधाते (कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी पुणे शहर व अध्यक्ष, वामा विमेन्स क्लब) यांना लाभला.
या वर्षी बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सुस आणि महाळुंगे या प्रभागातील विविध सोसायट्या तसेच गणेश मंडळांनी एकत्रितपणे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या उत्साहाने सज्जता केली आहे. बाणेर परिसरातील सुस रोड, विधाते वस्ती व बाणेर गावठाणा येथे विशेष भक्तीभावाने श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
या ठिकाणी गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशीची आरती करण्यासाठी विशेष मान देण्यात आला होता. समाजातील विविध क्षेत्रातील नागरिक, महिला वर्ग, युवा कार्यकर्ते व मंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सौ. पूनम विधाते यांनी गणेशमूर्तीसमोर आरती केली.
आरतीच्या वेळी वातावरणात मंत्रोच्चार, ढोल-ताशांचा गजर आणि भाविकांचा जयघोष घुमला. उपस्थित सर्वांनी पूनम ताईंच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले आणि गणेशोत्सव हा एकोपा, भक्ती व संस्कारांचा संदेश देणारा पर्व असल्याचे प्रतिपादन केले.
गणेशभक्तांसोबत संवाद साधताना सौ. पूनम विधाते म्हणाल्या की, “गणेशोत्सव हा समाज एकत्र आणणारा आणि आपल्याला सकारात्मकतेची प्रेरणा देणारा सण आहे. गणरायाच्या कृपेने आपल्या समाजात सौहार्द, शांती आणि प्रगती लाभो हीच प्रार्थना.”
कार्यक्रमास स्थानिक नागरिक, सामाजिक संघटना, मंडळांचे पदाधिकारी, महिला वर्ग आणि युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी