पिरंगुट :
पिरंगुट येथील पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मधील प्राथमिक विभागातील विद्यार्थिनी श्रावणी जाधव इयत्ता- चौथी मध्ये शिकत आहे.हिने आपल्या मेहनतीच्या जोरावर १६वे महाराष्ट्र राज्य कूडो स्पर्धा २०२५-२६ खंडाळा येथे झाली. तिने स्पर्धा
जिंकून सर्वांचा अभिमान वाढवला आहे.
श्रावणीने सातत्याने केलेला सराव, खेळावरील निष्ठा आणि अपार जिद्द यामुळे तिने हे यश मिळवले. कूडोसारख्या कठीण व रोमांचक खेळात तिने दाखवलेली शौर्य, चपळाई आणि आत्मविश्वास खरोखरच कौतुकास्पद आहे. तिच्या या विजयामुळे शाळा, महाविद्यालय तसेच संपूर्ण गावाचे नाव उज्ज्वल झाले आहे.
आज श्रावणी जाधव अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. तिच्या या यशामुळे भविष्यातील राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील ती मोठे यश मिळवेल, असा विश्वास सगळ्यांना वाटतो.




























More Stories
कोथरूड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ९ च्या विकासकामांचा निधी रद्द; राजकीय वैमनस्यातून जनतेच्या कामात खोडा : अमोल बालवडकर
*म्हाळुंगे गावातील रस्ता व ड्रेनेजच्या कामांना गती* *ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत म्हाळुंगे गावच्या शिष्टमंडळाची चर्चा*
*पिरंगुटच्या पेरिविंकलमध्ये व्यसनमुक्तीचा जागर; नागपंचमीच्या औचित्याने विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा!!*