सुस :
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक असलेला गणेशोत्सव सुस गावात मोठ्या श्रद्धा व उत्साहात साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा शिवसेना प्रमुख व पं.स. मुळशी मा. सभापती बाळासाहेब लक्ष्मी रामदास चांदेरे यांनी सुसगाव परिसरातील विविध गणेशोत्सव मंडळांना भेटी देऊन बाप्पाचे दर्शन घेतले.
सुसगावातील बालमित्र मंडळाच्या गणपती बाप्पाच्या आरतीला त्यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी मनोभावे पूजा करून “वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभः निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा” हा मंत्र उच्चारला व समाजातील सर्वांना सुख, समृद्धी व आनंद लाभावा अशी प्रार्थना केली.
या भेटीद्वारे गणेशोत्सवात सामाजिक ऐक्य, भक्तीभाव आणि आनंदाचा उत्साह अधिकच वाढला. सर्वांना शुभेच्छा देताना बाळासाहेब चांदेरे म्हणाले, “गणपती बाप्पा सुस गावातील प्रत्येक कुटुंबाला सुख-शांती व प्रगती देवो, हीच माझी प्रार्थना.”





























More Stories
कोथरूड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ९ च्या विकासकामांचा निधी रद्द; राजकीय वैमनस्यातून जनतेच्या कामात खोडा : अमोल बालवडकर
*म्हाळुंगे गावातील रस्ता व ड्रेनेजच्या कामांना गती* *ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत म्हाळुंगे गावच्या शिष्टमंडळाची चर्चा*
*पिरंगुटच्या पेरिविंकलमध्ये व्यसनमुक्तीचा जागर; नागपंचमीच्या औचित्याने विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा!!*