बालेवाडी :
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राहुल दादा बालवडकर जनसंपर्क कार्यालय, दसरा चौक, बालेवाडी येथे खास गणपती विसर्जन तालाव उभारण्यात आला आहे. पर्यावरणपूरक पद्धतीने गणरायाचे विसर्जन व्हावे या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला असून, पहिल्याच दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
राहुल दादा बालवडकर यांनी सांगितले की, “नदी-नाले प्रदूषित होऊ नयेत आणि आपले जलस्रोत स्वच्छ राहावेत यासाठी नागरिकांना पर्यायी सोय उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. विसर्जन तालावामुळे भक्तांना सुरक्षित आणि स्वच्छ वातावरणात गणरायाला निरोप देणे शक्य झाले आहे.”
नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून पुढील काही दिवसांत अधिकाधिक विसर्जन या तालावात होईल अशी अपेक्षा आहे.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी