सुसगाव :
सुसगाव परिसरामध्ये सकाळच्या सत्रात प्रचंड वाहतूक जाम होत आहे. बऱ्याच वेळा उद्भवणाऱ्या वाहतूक कोंडीला नागरिकांचा बेशिस्तपणा कारणीभूत ठरत आहे. नागरिकांनी शिस्त पाळल्यास बऱ्याच अंशी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. परंतु काही नागरिक प्रचंड घाई गडबड करीत वाहतुकीचे नियम मोडत गाड्या आडवी तिडवी घालतात. त्यामुळे वाहतूककोंडी आणखीनच वाढत जाते. अशा बेजबाबदार बेशिस्त वाहतूक चालकांना शिक्षा होणे गरजेचे आहे. त्या शिवाय हा बेशिस्तपणा कमी होणार नाही.
सोमवारी सकाळी प्रचंड वाहतूक कोंडी झाली असता माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी रस्त्यावर उतरून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.
वाहतुक जाम झाले आणि पोलीस यंत्रणा अजुन आलेली नाही हे लक्षात येताच मी स्वतःच दोन तास प्रत्यक्षात मुख्य रस्त्यावर उभे राहुन वाहतुक नियंत्रणात आणण्याचे काम करत होतो. आपल्या परिसरात दररोज सकाळी नागरिक मोठया संख्येने ये-जा करतात. नागरिकांनी स्वःतची जबाबदारी ओळखुन वाहतुक नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करावेत ही विनंती. वाहतूक व्यवस्था नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करत असताना वाहतूकदारांचे कटू अनुभव यावेळी मिळाले – माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे
More Stories
नवीन समाविष्ट ३४ गावांच्या ९ नियुक्त लोकप्रतिनिधी मध्ये बाबुराव चांदेरे यांची वर्णी, महाराष्ट्र शासनाकडून अध्यादेश जारी..
सूसगाव येथील बेलाकासा सोसायटीजवळ बांधकाम साईटवर काम करणाऱ्या कामगारांच्या वसाहतीत आग, वीस घरे जळून खाक, तीन सिलिंडर चे स्फोट…
पेरिविंकल च्या सुस शाखेत प्री -प्रायमरीतील चिमुकल्यांचा पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न!!!