May 9, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

महाळुंगे येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त काळुराम गायकवाड यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य वाटप

महाळुंगे :

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महाळुंगे गावचे माजी सरपंच भाजपा पुणे शहर सहकार आघाडीचे उपाध्यक्ष काळुराम गायकवाड यांच्या वतीने महाळुंगे गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले.

 

याबद्दल माहिती देताना काळूराम गायकवाड म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सूचना केल्याप्रमाणे त्यांचा वाढदिवस सेवा दिवस म्हणून साजरा केला जावा या हेतूने जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. जनतेसाठी कार्यरत राहणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांना दीर्घायुष्य लाभावे अशा सेवा दिवस साजरा करत शुभेच्छा व्यक्त केल्या.