सूसगाव :
सूसगाव येथील बेलाकासा सोसायटीजवळ रचना लाईफस्टाईल डेव्हलपर्स यांच्या बांधकाम साईटवर काम करणाऱ्या कामगारांच्या लेबर कॅम्प राहणाऱ्या घरात आग लागल्याची घटना आज सकाळी १०:३० सुमारास घडली. या आगीत वीस घरे जळून खाक झाल्याने लेबर कॅम्प मधे राहणाऱ्या कामगारांचे फार नुकसान झाले असुन सर्व दुःख व्यक्त करत हताश होऊन उभे होते. कामगारांच्या दैनंदिन जीवनोपयोगी साहित्य, दागिने, कागदपत्रे व रोख रक्कम जळून नुकसान झाले आहे. कामगारांच्या दैनंदिन जीवनोपयोगी साहित्य, दागिने, कागदपत्रे व रोख रक्कम जळून नुकसान झाले आहे.
सदर घटना घडली त्यावेळी कामगार कामावर गेले असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कामगारांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले. सदर घटनेत स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या एकूण एकोणतीस सिलिंडर टाक्या जळाल्या त्यापैकी तीन टाक्यांचे स्फोट झाले होते. एकूण सव्वीस सिलिंडर जळालेल्या अवस्थेत बाहेर काढण्यात आले.अग्निशमन दलाच्या जवानांनी दीड वाजेपर्यंत पुर्णपणे आग आटोक्यात आणली.
आग लागल्याची माहिती मिळताच आग विझविण्यासाठी पाषाण अग्निशमन केंद्रासह इतर ठिकाणचे सहा बंब दाखल झाले. त्वरित मदत कार्य सुरू करत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. दुपारी आग पूर्णपणे आटोक्यात आणली गेली. एकूण पन्नास पत्र्याचे शेड उभारून तेथे कामगारांना राहण्याची सोय करण्यात आली होती यापैकी वीस घरे जळून खाक झाली.
More Stories
नवीन समाविष्ट ३४ गावांच्या ९ नियुक्त लोकप्रतिनिधी मध्ये बाबुराव चांदेरे यांची वर्णी, महाराष्ट्र शासनाकडून अध्यादेश जारी..
पेरिविंकल च्या सुस शाखेत प्री -प्रायमरीतील चिमुकल्यांचा पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न!!!
पेरिविंकल सूस चे विद्यार्थी आंतरशालेय नृत्यस्पर्धेतही अव्वल!!!