September 8, 2024

Samrajya Ladha

पेरिविंकल च्या सुस शाखेत प्री -प्रायमरीतील चिमुकल्यांचा पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न!!!

सुस :

चैतन्य विद्या प्रतिष्ठान च्या पेरिविंकल इंग्लीश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या सूस शाखेत शनिवार दि.9 मार्च 2024 रोजी पूर्व प्राथमिक विभागातील सिनियर के जी च्या विद्यार्थांचे पूर्व प्राथमिक शिक्षण संपून प्राथमिक विभागात प्रवेश करीत असताना सिनियर के जी च्या सन 2023-24 या बॅच च्या विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ म्हणजेच ग्रॅज्युएशन डे किंवा कॉनव्होकेशन समारंभ सर्व पालकांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात व थाटात संपन्न झाला.

 

पदवीदान समारंभसाठी सिनियर के जी च्या सर्व विद्यार्थ्यांना दीक्षांत गाऊन व त्याची कॅप घालून व पारंपरिक औक्षण करून व फुलांच्या पाकळ्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करून पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी या खास “शाही-पदवीदान ” समारोहाचे आयोजन केले होते.

कार्यक्रमाचा शुभारंभ पारंपरिक सरस्वती पूजनाने व दीपप्रज्वलनाने करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा श्री राजेंद्र बांदल सर, संस्थेच्या संचालिका सौ रेखा बांदल व शाळेचे तरुण तडफदार संचालक यशराज बांदल तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित आदी मान्यवर उपस्थित होते.

शाळेच्या अगदी प्रवेश द्वारापासूनच सर्व मान्यवरांचे व सर्व विद्यार्थ्यांचे अत्यंत उत्साहात व थाटात स्वागत करण्यात आले होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते सिनियर के जी च्या सर्व विद्यार्थ्यांना पूर्व प्राथमिक विभाग यशस्वीपणे पूर्ण करून प्राथमिक विभागात प्रवेश मिळण्यासाठी सज्ज असल्याची पावती म्हणजेच पूर्वप्रथमिक शिक्षण पूर्ण केल्याची पदवी प्रशस्तिपत्रक प्रदान करून सर्व विद्यार्थ्याचे कौतुक करण्यात आले.

यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून त्यांचा सन्मान करण्यात आला. पदवीदान समारंभासाठी उपस्थित मान्यवारांनी देखील पदवी वाटप करतांना दीक्षांत पोशाख व कॅप परिधान केली होती.

त्यानंतर या चिमुकल्यांनी शाळेबद्दल व शिक्षकांबद्दलचे त्यांचे मनोगत व्यक्त केले.आनंद व दुःख या दोन्ही समिश्र भावना व शिक्षकांप्रती असलेला आदर त्यांच्या हालचालीतून व्यक्त होत होता . तसेच त्यांच्या वर्गशिक्षिका व इन्चार्ज यांनी देखील विद्यार्थ्यांप्रती असलेली आत्मयीता व्यक्त करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी वर्षभरात राबवलेल्या उपक्रमांना उजाळा देऊन यात महत्वाचे योगदान असलेल्या संस्थेचे , मान्यवरांचे व पूर्व प्राथमिक शिक्षकांचे व पालकांचे आभार मानून सर्व विद्यार्थ्यांचे प्राथमिक विभागात स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व यूनिवर्सिटी कडे वाटचाल असल्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुस ब्रांच सज्ज असल्याची ग्वाही देत केवळ प्री प्रायमरी चा पदवीदान समारंभ नव्हे तर हे विद्यार्थी पेरिविंकल मधून पद्युत्तर पदवी प्रदान करूनच बाहेर सज्ज होतील असे आश्वासन दिले.

संस्थेच्या संचालिका सौं रेखा बांदल यांनी सर्व विद्यार्थ्यांना आवडते मज मनापासुनी शाळा लाविते लळा या उक्तीप्रमाणे खरंच या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर असणारा आनंद खूप मोलाचा आहे असे सांगून अशीच प्रगती होऊन यशस्वी होऊन उंच शिखर गाठा व शाळेचे व पालकांचे नाव उज्वल करा असा मोलाचा संदेश सर्वांना दिला.

या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्या अध्यक्षतेखाली सर्व इन्चार्जेस व पूर्व प्राथमिक विभागाच्या शिक्षकांच्या सहकार्याने आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मदतीने अत्यंत शिस्तबद्ध पध्तीने करण्यात आले होते. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ला पाटील यांनी केले.