April 10, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

नवीन समाविष्ट ३४ गावांच्या ९ नियुक्त लोकप्रतिनिधी मध्ये बाबुराव चांदेरे यांची वर्णी, महाराष्ट्र शासनाकडून अध्यादेश जारी..

बाणेर :

बाणेर – बालेवाडी या परिसराचा नियोजनबद्ध विकास करण्यामध्ये यशस्वी ठरलेले त्याचप्रमाणे पुणे महानगरपालिकेमध्ये एक वर्ष स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून अतिशय उत्कृष्टपणे काम पाहणारे सलग दोन अर्थसंकल्प सादर करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांची नवीन समाविष्ट ३४ Elsewhere लोकप्रतिनिधी म्हणून सुस, महाळुंगे व बावधान या गावांकरिता नियुक्ती करण्यात आली.

 

या नियुक्तीचा फायदा निश्चितपणे या तिन्ही गावांना विकास कामे करण्याकरिता होईल, प्रशासन लागू झाल्यानंतर चांदेरे यांनी सुस व म्हाळुंगे या गावांकरिता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून अनेक निधी उपलब्ध करून या दोन्ही गावामध्ये विविध विकास कामे केली, जनहितासाठी सतत अहोरात्र धडपड करत बाणेर, बालेवाडी प्रमाणेच सुस व म्हाळुंगे गावांचा नियोजन बद्ध विकास करण्याचा मानस केला आणि त्याप्रमाणे या दोन्ही गावांमध्ये नागरिकांसाठी मुलभूत सुख सुविधा पुरविल्या.

पुढे भविष्यात डी पी रस्ते, स्मशानभूमी, पिण्याच्या पाण्याची टाकी बांधणे, टँकर द्वारे नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवठा करणे असे अनेक सुविधा उपलब्ध करून देण्याचा बाबुराव चांदेरे यांचा प्रयत्न असणार असल्याचे चांदेरे यांनी सांगितले.