May 7, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सुसगावातील वाहतूक कोंडीचे निराकरण करण्यासाठी माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या वतीने ट्रॅफिक वॉर्डन ची नेमणूक..

सुसगाव :

मागील अनेक दिवसापासून सुसगाव मध्ये होणारी वाहतूक कोंडी ही फार मोठी समस्या बनली आहे. बऱ्याचदा वाहन चालक बेशिस्तपणे वाहन चालवत असल्याने वाहतूक कोंडी मध्ये जास्त प्रमाणात भर पडते. सुसगाव मधील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक, शालेय विद्यार्थी प्रचंड हैराण झाले होते. प्रचंड प्रमाणात होणाऱ्या वाहतूक कोंडीला रोखण्यासाठी माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या वतीने सुसगाव मध्ये ट्रॅफिक वॉर्डन ची नेमणूक करण्यात आली.

 

आपल्या परिसरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी ही फार मोठी समस्या बनली आहे. तिचे निराकरण करता यावे व नागरिकांना या समस्येपासून दिलासा मिळावा यासाठी आवश्यक असणारे ट्रॅफिक वॉर्डन आवर्जून सुसगावामधील नागरिकांसाठी उपलब्ध करून देत आहे. निश्चितच ट्रॅफिक वॉर्डन मुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्याकरिता मदत होईल. शाळेतील विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रवास करणाऱ्या सगळ्यांना दिलासा मिळेल. वाहतूक शाखेचे प्रशासकीय अधिकारी आणि अमोल बालवडकर फाउंडेशनच्या माध्यमातून ही समस्या निराकरण करण्यासाठी प्रयत्न केला जाईल – माजी नगरसेवक अमोल बालवडकर