September 17, 2024

Samrajya Ladha

सुसगाव येथे शिवसैनिक डॉ. दिलीप मुरकुटे पाटील यांच्या वतीने आदर्श माता पुरस्कार देत उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा..

सुसगाव :

शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त शिवसैनिक डॉ. दिलीप मुरकुटे पाटील यांच्या वतीने महाराष्ट्र भूषण समाज प्रबोधनकार ह भ प निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांचे कीर्तन आणि सुस गावातील आपल्या कर्तृत्वावर मुलांना घडविणाऱ्या मातांना आदर्श माता पुरस्कार देऊन शिवसेना जिल्हाप्रमुख शंकर मांडेकर आणि समाजसेविका ममताताई सिंधुताई सपकाळ यांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले.

यावेळी प्रास्ताविक करताना शिवसैनिक संस्थापक अध्यक्ष बाणेर नागरी पतसंस्था डॉ. दिलीप मुरकुटे पाटील म्हणाले की, अवघा महाराष्ट्र संकटात असताना मुख्यमंत्री म्हणून त्यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्राला धैर्याने तोंड देत कसे खंबीरपणे उभे राहायचे हे शिकविले. अशा प्रगल्भ आणि खंबीर नेतृत्वाला शुभेच्छा देताना सुस गावातील महिला भगिनींना आदर्श माता पुरस्कार देत सन्मान करत आहे.

डॉ. दिलीप मुरकुटे पाटील यांनी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करताना मुलांना घडविणाऱ्या मातांचा सन्मान केला आणि सुस गावातील सांप्रदायिक क्षेत्रातील वावर लक्षात घेत समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे कीर्तन नागरिकांसाठी उपलब्ध करून दिले. समाजात काम करताना समाजाप्रती आपले काहीतरी देणे लागते या उदात्त हेतूने मुरकुटे पाटील हे काम करत आहेत – शंकर मांडेकर शिवसेना जिल्हा प्रमुख ऊ. ठ. बा.)

यावेळी ह. भ. प. पांडुरंग आप्पा दातार, संतोष मोहोळ (उपजिल्हा प्रमुख शिवसेना ऊ. ठ. बा.)ह. भ. प. नामदेव भेगडे, वसंत चांदेरे (शिवसेना शाखा प्रमुख सुसगाव) संतोष तोंडे (विभाग प्रमुख कोथरूड मतदार संघ) राम गायकवाड, रखमाजी पाडाळे, युगंधरा मुरकुटे, गहिनीनाथ कळमकर, मकरंद कळमकर, श्याम बालवडकर, वाल्मीक चांदेरे, धनंजय भोते, बाणेर नागरी पतसंस्था चेअरमन राजू शेडगे, गणेश मुरकुटे, संतोष भोसले, तसेच भैरवनाथ भजनी मंडळ, ज्ञानज्योत भजनी मंडळ, ज्ञानदीप भजनी मंडळ आणि ग्रामस्थ उपस्थित होते.