May 21, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

डॉ. दिलीप मुरकुटे पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांची विभाग स्तरीय बैठक संपन्न..

बाणेर :

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांची विभाग स्तरीय बैठक बाणेर येथे डॉ. दिलीप मुरकुटे यांच्या संपर्क कार्यालयात कोथरूड विधानसभा मतदार संघ संपर्क प्रमुख राम कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

 

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची संघटनात्मक बांधणी कशी असावी याबद्दल कोथरूड विधानसभा मतदार संघ संपर्क प्रमुख राम कदम यांनी मार्गदर्शन केले.

स्वाभिमानाने निष्ठेने शिवसैनिक हा नेहमी ठामपणे उभा असतो. स्वर्गीय हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक येणाऱ्या अडचणींना न डगमगता कोणतीही अपेक्षा न ठेवता संघटनात्मक वाढीसाठी प्रयत्न करत असतो : डॉ. दिलीप मुरकुटे पाटील

कोथरूड मतदार संघ संपर्कप्रमुख राम कदम, उप शहर संघटक नितीन शिंदे, युवा सेना अधिकारी वैभव दिघे यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी विभाग प्रमुख संतोष तोंडे, उप विभाग प्रमुख दिनेश नाथ, उप विभाग प्रमुख संदीप सातव,जेष्ठ शिवसैनिक दिलीप मुरकुटे, शिवसैनिक अमोल फाले, रखमाजी पाडळे, पुरुषोत्तम पाडाळे, गौरव पाडाळे दयानंद बाबर, संदीप गंगे, सोहेल मुलानी, मनीष भालेराव, संतोष भोसले, पोपट गरड, सलीम सुतार, अनिल लिंगे, स्वप्निल रंध्रे, सैफन मुलांनी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.