March 21, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सुसगाव येथील रुद्रनाथ ढोल ताशा पथकाने वाद्यपूजन करून सरावास केली सुरुवात..

सुसगाव :

सुसगाव येथील प्रसिद्ध रुद्रनाद ढोल ताशा पथकाचे वाद्यपूजन माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या हस्ते करून यावर्षीच्या सरावाची सुरुवात सर्व सभासदांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते अनिल ससार यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या सहाव्या वर्षामध्ये अतिशय तालबद्ध पद्धतीने रुद्रनाद ढोल पथकाने आपल्या सरावास जोमाने सुरुवात केली.

आपल्या परीसरात मागील सहा वर्षांपासून रुद्रनाद ढोलताशा पथक भरारी घेत आहे. ढोल ताशांच्या पथकांना अनेक अडचणी येतात. तरी देखील खंबीर पणे हे पथक आपली संस्कृती परंपरा जपत मोठ्या जोमाने सराव करून आपले नाव वाढवत आहे. येणाऱ्या पुढील काळात देखिल आम्ही पथकाला प्रोत्साहित करण्यासाठी उपस्थित राहू – माजी नगरसेवक अमोल बालवडकर

माजी नगरसेवक अमोल बालवडकर, माजी सरपंच काळूराम गायकवाड, बांधकाम व्यावसायिक विक्रम विनोदे, दिपक चांदेरे, सुधीर सुतार, अनिल चांदेरे, सुनील चांदेरे, नंदुशेट साळुंके, भाऊसाहेब चांदेरे, रवी साळुंके, योगेश पाडाळे, समीर पारखी, प्रभंजन फणसे, संदीप बांदल, संतोष साळगावकर, विजय व्यवहारे, गौरव कुमठेवार, चंदेल काका, गावरकर, योगेश पाडाळे, राम साबळे, राजू काळजे, पप्पू चांदेरे आणि रुद्रनाथ ढोल ताशा पथकातील सभासद उपस्थित होते.