May 21, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पाषाण सुस रस्त्यावरील साई चौक ते विघ्नहर्ता चौक रस्त्यावरील पथदिवे बंद, नागरीकांना नाहक त्रास…

पाषाण :

पाषाण सुस रस्त्यावरील साई चौक ते विघ्नहर्ता चौक या रस्त्यावर पथदिवे बंद पडले असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत असून महापालिका विद्युत विभागाकडून याची दखल घेतली जात नसल्याची तक्रार नागरीक करत आहेत.

 

पाषाण सुस रस्त्यावरील साई चौक ते विघ्नहर्ता चौक हा अतिशय रेलचेल असलेला रस्ता असून मोठया प्रमाणावर या रस्त्यावरून वाहतूक तर होतेच शिवाय रात्री व पहाटे नागरीक येथे मोठया प्रमाणात वॉकिंग करत असतात. तसेच शाळेला जाणारी मुले सकाळी बऱ्याच प्रमाणात उभी असतात, शिवाय सोसायटी वर्गाला येथे असणाऱ्या दुकानामध्ये घरगुती कामासाठी ये जा करावी लागते. अशा परिस्थितीत गेले महिना भर पथदिवे बंद असल्याने नागरिकांना रस्ता क्रॉस करणे धोकादायक आहे, तसेच ज्येष्ठ नागरिकांना चालताना देखिल चाचपडत चालावे लागत आहे. त्यामूळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणुनच महापालिका विद्युत विभागाकडून त्वरित यावर उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरीक करत आहेत.