May 1, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पाषाण सूस रोड वरील श्री स्वामी समर्थ मठात सामुदायिक श्रमदानातून साफसफाई..

पाषाण :

भारताचे मा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या येथील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त देशभरातील सर्व तीर्थक्षेत्रे, मठ, देवस्थाने यांची सामुदायिक श्रमदानातून साफसफाई करावी असे आवाहन केले. त्या आवाहनाला प्रतिसाद देत देशभर “स्वच्छ तीर्थ” अभियान राबवण्यात आले आहे.

 

त्या अनुषंगाने आज पाषाण सूस रोड वरील श्री स्वामी समर्थ मठात सामुदायिक श्रमदानातून साफसफाई कार्यक्रम झाला.

यावेळी भाजप उत्तर कोथरूड मतदारसंघ अध्यक्ष सचिन पाषाणकर, उपाध्यक्ष कल्याणी टोकेकर, सरचिटणीस सचिन दळवी, पाषाण प्रभाग अध्यक्ष प्रमोद कांबळे, मंदिर व्यवस्थापक दीपक मंडळे, कपिल जाधव, दीपक बामगुडे, विष्णू काकडे आणि भागातील नागरिकांनी उस्फुर्त सहभाग घेतला. सफाई अभियान झाल्यावर मठाचे पुजारी यांनी सगळ्यांना प्रसाद आणि श्रीफळ दिले.

You may have missed