April 9, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सोमेश्वरवाडी येथे सचिन दळवी सोशल फाउंडेशन आयोजित हळदी कुंकू समारंभास महिलांचा उत्स्फूर्त सहभाग…

सोमेश्वरवाडी :

नववर्षातील मकरसंक्रांत या पहिल्या सणानिमित्त सचिन दळवी सोशल फाउंडेशन च्या वतीने सोमेश्वरवाडी, पाषाण, सुतारवाडी परिसरातील महीलांसाठी मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील हळदी कुंकू समारंभ सौ. मोनिका ताई मुरलीधर (आण्णा) मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमेश्वरवाडी येथे आयोजित करण्यात आला होता.

 

महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ फार महत्वाचा असतो. आपली परंपरा जोपासत एक चांगला कार्यक्रम महिलांसाठी राबविण्याचे काम सचिन दळवी फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले. असेच विविध उपक्रम महिलांसाठी ते राबवतात याचे कौतुक वाटते : सौ.मोनिका मुरलीधर मोहळ

या प्रसंगी मा.नगरसेविका सौ. ज्योतीताई कळमकर, मा.नगरसेविका सौ.स्वप्नालीताई सायकर, विद्या ताई बालवडकर, सुजाता धनकुडे, अंकिता दळवी, मयुरी ताई कोकाटे, कल्याणी टोकेकर, निकिता माताडे यांनी हळदी कुंकू समारंभास भेट दिली. यावेळी सर्व सोमेश्वरवाडी, पाषाण, सुतारवाडी भागातील महिला भगिनी उपस्थित होत्या.