June 5, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सोमेश्वरवाडी येथे सचिन दळवी सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित पतंग महोत्सवात मुलांचा मोठ्या उत्साहात सहभाग.

सोमेश्वरवाडी :

सोमेश्वरवाडी येथे गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षी देखील सचिन दळवी सोशल फाउंडेशनच्या वतीने मकरसंक्रांतीचे निमित्त साधून परिसरातील लहान मुलांसाठी पतंग महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुलांनी मोठ्या उत्साहात पतंग उडविण्यासाठी उपस्थित राहुन आनंद घेतला. विविध आकार-प्रकारांच्या रंगी-बेरंगी पतंग उडविण्याचा आनंद मुलांनी घेतला.

मकरसंक्रांत आली की पतंग उडविण्याचा मुलांचा छंद जोर पकडतो. भारतात मोठया प्रमाणात पतंग महोत्सव सुरू होतो. मुलांचा पतंग उडविण्याचा छंद जोपासला जावा व त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी दरवर्षी पतंग महोत्सव आयोजित केला जातो. लहान मुलांसोबत मोठ्या उत्साहात भाजपा कोथरूड उत्तर विधानसभा सरचिटणीस सचिन दळवी पतंग उडविण्यात सहभागी होऊन पतंग उडविण्याचा आनंद घेतात.

लहानपणी पतंग मिळणे व उडविणे फार आनंद द्यायचे. हाच आनंद लहान मुलांना पतंग उडविताना घेता यावा म्हणून पतंग महोत्सव आयोजित केला. मुलांसोबत पतंग उडविण्याचा आनंद मिळाला. मुलांचा उत्साह पाहून छोट्या बाल गोपाळांसाठी एक वेगळा उपक्रम राबविला याचे समाधान मिळते : सचिन दळवी(सरचिटणीस भाजपा कोथरुड उत्तर विधानसभा/ संस्थापक अध्यक्ष सचिन दळवी सोशल फाउंडेशन)

यावेळी अमित बामगुडे(कोथरुड विधानसभा मतदार संघ (ऊ) सचिव), अनिकेत चव्हाण(कोथरुड विधानसभा मतदार संघ (ऊ) सचिव), विष्णु काकडे, गोकुळ जाधव व कार्यकर्ते उपस्थित होते.