May 19, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

शिवम सुतार यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे दिवाळीनिमित्त स्वच्छता कर्मचाऱ्यांना मिठाई वाटप !

सुतारवाडी :

सुतारवाडी येथे माजी स्वीकृत नगरसेवक शिवम सुतार यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब सुतार यांच्या हस्ते परिसरातील सफाई कामगारांना मिठाई वाटप केली.

 

सफाई कामगार हा समाजातील मुख्य घटक असतोच. आपल्या जिवाची पर्वा न करता रस्ते साफसफाई व घरातील कचरा संकलनाचे काम नियमित चालू ठेवून ख-या अर्थाने आपल्या सर्वाच्या आरोग्याची काळजी घेत असतात. यामुळेच त्यांची दिवाळी आनंदात जावी या उदात्त हेतूने आपण दरवर्षीप्रमाणे स्वच्छता कर्मचाऱ्यांना मिठाई वाटप केले : शिवम सुतार (मा. स्वीकृत नगरसेवक)

यावेळी सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब सुतार, ज्ञानेश्वर भेगडे, विठ्ठल आण्णा सुतार, अमोल सुतार, संतोष गावडे, रणजीत सुतार, दत्ता कोंढाळकर, अक्षय सुतार, प्रसाद सुतार, शाहरुख शेख, मंगेश ओव्हाळ, शुभम ठाकुर, अमर सुतार, कुलदीप सुतार, राहुल बहिरमे, यश घोरपडे, चेतन खेडेकर तसेच शिवम सुतार मित्र परिवार उपस्थीत होता.