September 17, 2024

Samrajya Ladha

सोमेश्वरवाडी येथे “विकसित भारत संकल्प यात्रेस” नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद…

सोमेश्वरवाडी :

पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित “विकसित भारत संकल्प यात्रेत” केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देत मार्गस्थ झालेल्या विकसित भारत रथ यात्रेचे आज सोमेश्वरवाडी येथे आगमन झाले. त्याचे स्वागत पोपटराव जाधव, जगन्नाथ दळवी, रवी जोरे, मधुकर दळवी, तारामण जाधव, संतोष जोरे आणि भाजपा कोथरुड विधानसभा सरचिटणीस सचिन दळवी मित्र परिवार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, कोथरुड उत्तर विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, मा. नगरसेविका ज्योती कळमकर, पुणे शहर चिटणीस राहुल दादा कोकाटे, कोथरुड युवा मोर्चा अध्यक्ष रोहन कोकाटे, उत्तम जाधव, प्रवीण आमले उपस्थित होते आणि नागरीकांना सेवा पुरविणाऱ्या सर्व प्रशासकीय यंत्रणेचा गुलाब पुष्प देऊन कोथरूड विधानसभा उत्तर मंडल वतीने सन्मान करण्यात आला.

विकसित भारत रथ यात्रेत विविध लोकाभिमुख योजनांचे स्टॉल्स उभारून येणाऱ्या नागरिकांची योजनांसाठी नावनोंदणी करण्यात आली. यावेळी डिजिटल स्क्रीनच्या माध्यमातून विविध योजनांच्या माहितीची व या योजनांमुळे जनतेच्या जीवनात होत असलेल्या परिवर्तनाची माहिती सांगणारी चित्रफीत सादर करण्यात आली.

“विकसित भारत संकल्प यात्रेत” केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात येत आहे यात चित्ररथ वाहनाबरोबर केंद्र शासनच्या पी.एम स्वनिधी योजना, आयुष्मान भारत जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना, राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम, आधार अपडेट, गरीब कल्याण अन्न सुरक्षा योजना व पुणे मनपाची शहरी गरीब योजना, मोफत आरोग्य तपासणी अशा विविध योजनांची माहिती वंचित नागरिकांपर्यत पोहोचवण्यात येत आहे. काही पात्र महिलांना प्रधानमंत्री ऊज्वला गॅस योजनेत मोफत गॅस देखील देन्यात आला.