April 29, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

२६ आॕक्टोबर गुरुवार रोजी प्रथम स्मृतिदिनानिमित्त ‘विनायकी’ विनायक निम्हण गौरव शिष्यवृत्तीचे वाटप

पुणे :

दिवंगत माजी कार्यसम्राट आमदार विनायक निम्हण यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त, पालकांची आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना सोमेश्वर फाउंडेशन तर्फे गुरवार (ता.२६) आॕक्टोबर रोजी सायं ५ वाजता, बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी ‘गौरव शिष्यवृत्तीचे’ वाटप डॉ.श.ब मुजुमदार, संस्थापक अध्यक्ष सिम्बायोसिस संस्था, डॉ. सुरेश गोसावी कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या अध्यक्षतेखाली, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, ग्रामविकास आणि पंचायत राज, पर्यटन मंत्री गिरीश महाजन, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.

 

यावेळी शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर , आमदार प्रसाद लाड,आमदार सिध्दार्थ शिरोळे, आमदार अतुल बेनके, आमदार सत्यजित तांबे , माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, विभागीय आयुक्त सौरभ राव, आयुक्त विक्रम कुमार, प्रशासक राज्य सहकारी बँक विद्याधर अनास्कर ,आजी माजी आमदार, नगरसेवक, विविध पक्षांचे व संस्थांचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

इयत्ता पाचवी व आठवीमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेल्या आणि काहीच गुण कमी पडल्यामुळे शिष्यवृत्ती न मिळालेल्या विद्यार्थ्यांना उमेद न सोडता प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक व्हावे यासाठी प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. डिग्री व डिप्लोमाच्या गुणवंत विद्यार्थांना आर्थिक निकष, गुणवत्ता आणि थेट मुलाखत या निकषांवर गरजू, गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना या सोहळ्यात शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे.

विनायक निम्हण गौरव शिष्यवृत्तीसाठी एकूण ३६८ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून यामध्ये इयत्ता पाचवी ५३ विद्यार्थी, आठवी ४७ विद्यार्थी , डिप्लोमा व डिग्री शिक्षण घेणाऱ्या २६८ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. कृषी अधिकारी विकास हेमाडे, प्रबोधन मंचाचे बिपीन मोदी, मराठा अॕन्थ्रोपीनर असोसिएशन अध्यक्ष अरूण निम्हण, विद्या सहकारी बँक संचालक संजय मयेकर यांनी मुलाखती घेऊन विद्यार्थ्यांची निवड केली.

माजी कार्यसम्राट आमदार विनायक निम्हण यांनी सर्वसामान्यांना उत्तम आरोग्य आणि अत्याधुनिक शिक्षण सुविधा मिळाव्यात यासाठी आयुष्यभर कार्य केले. त्यांनी स्थापन केलेल्या सोमेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून पुणे शहरात पाषाण व कोथरूड येथे सह्याद्री इंटरनॕशनल स्कूल तसेच पाषाण येथे ज्युनिअर कॉलेज कार्यरत असून अभ्यासिका देखील उपलब्ध आहेत. मागील २५ वर्षापासून सातत्याने १० वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेची तयारी करण्यासाठी मार्गदर्शन व्याख्यानमाला, गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभ तसेच दरवर्षी विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात येते. अशी माहिती ‘विनायकी’ विनायक निम्हण शिष्यवृत्तीचे निमंत्रक, माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी दिली.

You may have missed