November 21, 2024

Samrajya Ladha

बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील अथलेटिक्सच्या खेळाडूंची बक्षिसांची लयलूट व खेळाडूंनी मिळविली चॅम्पियनशिप…

सांगवी :

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा अंतर्गत पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे दिनांक 21 ते 22 ऑक्टोबर 2023 रोजी , ४२ वी पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीची ॲथलेटिक्स स्पर्धा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अथलेटिक्स ट्रॅक वर पार पडली. या वर्षी ९० हुन अधिक महाविद्यालयांचे १२०० शे हुन अधिक खेळाडूंनीं सहभाग नोंदविला.

सदर स्पर्धेमध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील निखिल आव्हाड एम ए, अर्णव टाकळकर एफ वाय बीए (100mtr. Running) अनुक्रमे सुवर्णपदक व रजतपदक, अर्णव टाकळकर याने पुन्हा 200 मीटर रनिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळविले, महेश जाधव (एफ वाय बीए) Long Jump सुवर्णपदक मिळविले कुमार जाधव 5000mtr. सुवर्णपदक व Steeple चेस मध्ये रजत पदक, श्रेयस चव्हाण एस वाय बीए (थाळीफेक मध्ये सुवर्णपद), सार्थक चव्हाण टी वाय बी बी ए, 200 मीटर मध्ये कांस्यपदक, श्रीराज चौगुले (एस वाय बी ए) रोहन घोगरे (एम ए) यांना डिकॅथलॉन स्पर्धेमध्ये अनुक्रमे सुवर्णपदक व कांस्यपदक मिळविले. तसेच श्रीराज चौगुले व रोहन घोगरे याने वन 110 Hurdles स्पर्धेमध्ये सुवर्णपदक व कांस्यपदक मिळविले. 100×4 Relay मध्ये समीर खर्चेकर, सार्थक चव्हाण, रोहन घोगरे व श्रीराज चौगुले यांनी रजत पदक मिळविले.

या स्पर्धेसाठी खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालिका डॉ. विद्या पाठारे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादन केल्यामुळे पुणे जिल्हा शिक्षण मंडळ,पुणे चे सर्व सन्मानीय पदाधिकारी व महाविद्यालयातर्फे सर्वांचे हार्दिक अभिनंदन तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.