December 3, 2024

Samrajya Ladha

औंध येथे विजयादशमीच्या निमित्ताने विद्यापीठ पुणे महानगरच्या राष्ट्र सेवा समितीच्या वतीने सघोष पथसंचलनाचे यशस्वी आयोजन..

औंध :

रविवार दि. २२ ऑक्टोबर, २०२३ रोजी विजयादशमीच्या निमित्ताने सकाळी विद्यापीठ पुणे महानगरच्या राष्ट्र सेवा समितीच्या वतीने सघोष पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये माजी नगरसेविका ज्योती कळमकर आणि माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर सहभागी झाल्या होत्या.

या सघोष पथसंचलनाला औध येथील गोळवलकर गुरुजी प्राथमिक शाळेच्या मैदानावरून सुरूवात झाली व विविध मार्गांने जाऊन याचा समारोप देखील या शाळेच्या मैदानातच करण्यात आला. महिलांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पथसंचलन सहभागी होत यशस्वी केले.

या पथसंचलनाला औंध परिसरातील नागरिकांनी अतिशय चांगला प्रतिसाद देऊन ते यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले. हे पथसंचलन नियोजनबद्ध पद्धतीने जसे ठरले होते त्याचपद्धतीने पार पडले. औंध मधील नागरिकांनी मोठया उत्साहात पथसंचलनाचे स्वागत केले.