November 21, 2024

Samrajya Ladha

गणेशखिंड येथील मॉडर्न महाविद्यालयात मानसशास्ञाचा ‘कॅलिडोस्कोप १६’ अंकाचे प्रकाशन

गणेशखिंड :

गणेशखिंड येथील माॅडर्न महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागात गेल्या पंधरा वर्षांपासून सातत्याने ‘कलायडोस्कोप’ हा त्रैभाषिक वार्षिक अंक प्रकाशित केला जातो. या वर्षीच्या कॅलिडोस्कोप अंक 16: च्या प्रकाशन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त लेखक, सह दिग्दर्शक व गीतकार सुनील सुकथनकर हे उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी लाभलेले अतिथी श्री सुनील सुकतनकर यांनी ‘दहावी फ’, ‘देवराई’, ‘कासव’ अशा अनेक सुप्रसिद्ध चित्रपटांचे सहदिग्दर्शन केलेले आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

श्री सुनील सुकतनकर यांनी आपल्या भाषणात जीवन प्रवासातील अनेक अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले आणि अनुभवातूनच मुलांना स‌ंयत समतोलनाचे आयुष्यातील महत्त्व पटवून दिले. त्यांच्या वक्तव्याने प्रभावित होऊन विद्यार्थ्यांनी प्रश्नमंजुषेत सक्रिय सहभाग घेतला.

विद्यार्थ्यांना लेखनाला प्रेरीत करण्यासाठी हा उपक्रम सुरु झाला. मागील काही वर्षांमध्ये प्रेम, आनंद, व्यसनाधीनता, भारतातील मानसशास्त्राचे शंभर वर्ष, जगावर प्रभाव पाडणारे मानसशास्त्रज्ञ, जीवन हाच संघर्ष अशा असंख्य विषयांवर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी लिखाण केले आहे.
या वर्षाच्या अंकामध्ये विद्यार्थ्यांनी लिहिलेले लेख, कविता, चित्र इत्यादींचा समावेश आहे. विशेष म्हणजे या अंकाच्या मुखपृष्ठापासून ते प्रकाशन सोहळ्यात पाहुण्यांची ओळख, गीत गायन, आभार प्रदर्शन या सर्वांमध्ये विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग होता. हा अंक महाराष्ट्रात तसेच माजी विद्यार्थ्यांमुळे परदेशातही पोहोचला आहे. या उपक्रमामुळे मानसशास्त्रातील तसेच महाविद्यालयातील इतर विभागातील विद्यार्थी मानसशास्त्र अभ्यास विषयाच्या लिखाणावर सातत्यपूर्ण लेखन करतात. यातील बरेचसे विद्यार्थी पहिल्यांदाच लेखनाचा प्रयत्न करत असतात आणि 3 ते 5 वर्षांत त्यांचे लेखन कौशल्ये निश्चित वाढते असे कला शाखेच्या उपप्राचार्य डाॅ ज्योती गगनग्रास यांनी सांगितले.

या कार्यक्रमासाठी मानसशास्त्र विभाग प्रमुख डाॅ साधना नातु यांनी आखणी केली तर मानसशास्त्र विभागातील नाशोम क्रास्टो व इतर सहाय्यक प्राध्यापिकांनी नियोजनात हातभार लावला मानसशास्त्र विभागाचे १०० ते १५० विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला. प्राचार्य डाॅ संजय खरात यांनी मार्गदर्शन केले. पी. ई. सोसाइटीचे सहकार्यवाह प्रा सुरेश तोडकर व डॉ प्रकाश दिक्षित, ऊपकार्यवाह यांनी कौतुक केले.