औंध :
औंध येथील श्री शिवाजी विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता १० दहावी वर्गाच्या २००० सालच्या बॅच चे २४ वर्षानंतर माजी विद्यार्थी स्नेह मेळावा पार पडला. मेळाव्याची सुरुवात राजांच्या पुतळ्याचे पूजन तसेच स्वर्गीय जगताप सरांच्या समाधीस पुष्पहार अर्पण करून आणि सरस्वती फोटोचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. जवळपास १७० माजी विद्यार्थी या मेळाव्यास जमले होते. तसेच निवृत्त झालेले जवळपास २० शिक्षक कार्यक्रमास उपस्थित होते.
माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील गरजू ८० विद्यार्थ्यांना शूज वाटप केले. तसेच एका हुशार आणि गरजू विद्यार्थ्याला सायकल भेट दिली. तसेच नव्याने उभारण्यात आलेल्या शिवाजी महाराजांच्या मेघडंबरीला २५०००/- देणगी दिली. विद्यार्थ्यांच्या वतीने विशाल शिंदे यांनी आईचे लिहिलेले मी अंजना शिंदे हे पुस्तक शिक्षकांना भेट देत, आम्हा विद्यार्थ्यांची यश हेच शिक्षकांचे एक यश आहे, असे म्हणून शिक्षकांचा गौरव सुद्धा केला.
तसेच मुलींच्या वतीने जगताप मॅम यांची कन्या डॉक्टर सुप्रिया जगताप यांनी सुद्धा आपल्या शाळेबद्दल ऋण व्यक्त केले. पुनम टकले, गणेश कळमकर, समिप मुरकुटे, प्रशांत पाडाळे यांच्या हस्ते शिक्षकांचा सत्कार झाला. मुळे मॅम, चितळकर मॅडम, शेळके सर पवार सर नवले सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
शिक्षकांच्या वतीने प्राचार्य पवार मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. दिवंगत झालेले शिक्षक आणि विद्यार्थी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच पोलीस खात्यात असणारे भूषण गोसावी, गणेश लोखंडे, समीर पटेल, निलेश दरेकर आणि मिलिटरीत असणारे संतोष देशमुख माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपापली ओळख करून दिली.
दुपारच्या जेवणानंतर वर्ग भरले शिक्षकांनी मोठ्या उत्साहाने मुलांना आपापले विषय काही काळासाठी शिकवले आणि विद्यार्थ्यांनी प्रश्नांची अचूक उत्तर दिली. बऱ्याच वर्षानंतर सर्व विद्यार्थी एकमेकांना भेटल्यामुळे आनंदात हा कार्यक्रम संपन्न झाला. सर्वांच्या वतीने निलेश जूनवने याने आभार मानले.
More Stories
गणेशखिंड येथील मॉडर्न महाविद्यालयात मानसशास्ञाचा ‘कॅलिडोस्कोप १६’ अंकाचे प्रकाशन
औंध येथील अमोल दत्तात्रय टेंबरे यांना भारत भूषण पुरस्कार प्रदान…
ग्राफिटीच्या हौशी कलाकारांचे चित्र प्रदर्शन संपन्न…