September 12, 2024

Samrajya Ladha

मॉर्डन महाविद्यालयात निर्भय कन्या अभियान संपन्न..

गणेशखिंड :

गणेशखिंड येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉर्डन कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळ यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित निर्भय कन्या अभियान विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण व जाणीव जागृती उपक्रम राबवण्यात आला.

 

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय खरात यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सोशल मीडिया वापरताना कोणती काळजी घेतली पाहिजे, सायबर सिक्युरिटी, विषयांवरती त्यांचे मत मांडले. निर्भय कन्या अभियानाचे मुख्य हेतू हा विद्यार्थिनींचे ध्येय साध्य करणे व मुली सुरक्षित राहणे हा आहे.मुली ह्या सक्षम झाल्या पाहिजेत असे त्यांनी सांगितले.

पाहुण्यांची ओळख डॉ निवेदिता दास यांनी करून दिली . या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी सोमय्या शेख व आझीम शेख आले होते. त्यांनी विद्यार्थिनींना सुरक्षतेसाठी सेल्फ डिफेन्स कशा प्रकारे करू शकतो याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी स्वसंरक्षणाचे धडे दिले. कराटे किंवा स्वसंरक्षणासाठी काहीतरी शिकायलाच पाहिजे यावर त्यांनी भर दिला.

प्रा.सुवर्णा म्हसेकर यांनी कार्यक्रमाचे समन्वय केले प्रा मृणाल परदेशी यांनी सूत्रसंचालन केले.