September 12, 2024

Samrajya Ladha

सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून निम्हण यांच्या कार्याची वाटचाल – आमदार शिरोळे

पुणे :

पुण्याचे युवा उद्योजक, माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या वादिवसानिमित्त ‘सुपर सनी वीक्’चे आयोजन १७ ते २५ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले होते. या कालावधीत जिल्हास्तरीय विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या तर, १९ ते २४ फेब्रुवारी या दरम्यान पुण्यातील १२ ठिकाणी मोफत आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती अभियान राबिवण्यात आले . यामध्ये नागरिकांना नवीन आधार कार्ड नोंदणी, नाव दुरुस्ती, मोबाईल नंबर, ईमेल आइडी, फोटो सुधारीत करणे, पत्ता बदलणे अशी कामे मोफत करून देण्यात आली. यासह पोस्टाची ‘सुकन्या समृद्धी योजना’ व आरडी बचत खाते योजना सुरू करण्यासाठी लागणारी पहिली रक्कम सोमेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून भरून नागरिकांची खाती सुरू करुन देण्यात आली. या योजनेचा हजारो नागरिकांनी लाभ घेतला.

 

खडकी , बोपोडी, गोखलेनगर, औंध, वडारवाडी परिसरातील नागरिकांचा या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. योजनेचा शुभारंभ आमदार सिध्दार्थ शिरोळे यांच्या हस्ते डेक्कन येथे केला. या वेळी दत्ता खाडे, मुकारी आलगुडे, आदित्य माळवे,दायानंद इरकल, विनोद ओरसे, गणेश बगाडे, रवींद्र साळेगावकर आदी उपस्थित होते.

आमदार शिरोळे मनोगत व्यक्त करताना म्हणाले, “प्रशासकीय योजनेचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळवून देणे हेच खरे सच्चा कार्यकर्ता असल्याचे अभिप्रेत आहे . नागरिकांच्या गरजा ओळखून धेतलेला कार्यक्रम लोकहिताचा आहे.

सुत्रसंचालन उमेश वाघ, समद शेख यांनी केले , संयोजन सचिन इंगळे, गणेश शिंदे, गणेश शेलार, अमित मुरकुटे, टिंकू दास, पप्पू परदेशी, राहुल कांबळे, अरूण चव्हाण, संजय माझिरे, सचिन मानवतकर, नागेश कांबळे, किरण पाटील, अनिष गाडे यांनी केले. आभार अनिकेत कपोते यांनी म्हणाले.