September 12, 2024

Samrajya Ladha

‘सुपर सनी विक’ पुणे ट्वीन सिटी मॅरेथॉन – रन फॉर अमृतकाल स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

बाणेर :

युवा उद्योजक आणि मा. नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमीत्त (२० फेब्रुवारी)सोमेश्वर फौंडेशनच्या वतीने आयोजित सुपर सनी विक” पुणे ट्वीन सिटी मॅरेथॉन – रन फॉर अमृतकाल स्पर्धेत धुलदेव घागरे, अर्चना आढाव, नागेश कारंडे,राणी मुलचंदानी यांनी अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले.

 

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे पार पडलेल्या या स्पर्धेत १०किमी पुरुष गटात धुलदेव घागरेने ३३मिनिटे०८सेकंद वेळ नोंदवत अव्वल क्रमांक पटकावला. तर पंकज नेवासे(००.३३.१६से) याने दुसरा, अभिजीत भस्मे(००.३३.३०से)याने तिसरा क्रमांक पटकावला. महिला गटात अर्चना आढावने ३९ मिनिटे ४७सेकंद वेळ नोंदवत पहिला क्रमांक पटकावला. थीर्धा गोपाकुमार के(००.४०.२२से) व निशा पासवान(००.४१.१४से) यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला.

फिट इंडिया फिट महाराष्ट्र पुणे बनवण्याच्या दृष्टीने पुणे ट्वीन सिटी मॅरेथॉन – रन फॉर अमृतकाल चे आयोजन करून सनी निम्हण यांनी महत्वाची भूमिका बजावली. पुणेकरांनी मोठया प्रमाणात सहभाग घेत पुण्याला स्पोर्टस सिटी बनविण्याच्या महत्वाचे पाऊल टाकले : धनराज पिल्ले(माजी कर्णधार भारतीय हॉकी)

मन शरीर आणि बुद्धी यांना चालना मिळावी या दृष्टीने ‘सुपर सनी विक’ चे आयोजन करत सनी निम्हण यांनी नागरिकांना व्यायामाकडे वळविण्याच्या दृष्टीने उत्कृष्ट नियोजन करत सुंदर उपक्रम राबविला आहे : चंद्रकांत पाटील (उच्च व तंत्रशिक्षण मंत्री)

२१ किमी पुरुष गटात नागेश कारंडे याने ०१.११.०९सेकंद वेळ नोंदवत प्रथम क्रमांक मिळवला. विकास पोळ(०१.१३.००से) याने दुसरा, निक्कू ऍथलेट्स(०१.१३.२९से) याने तिसरा क्रमांक पटकावला. महिला गटात राणी मुलचंदानी(०१.२३.२६से) हिने विजेतेपद पटकावले. शितल तांबे(०१.३९.५७से)ने दुसरा आणि साजीनी रोशन(०२.०४.४१से) हिने तिसरा क्रमांक मिळवला.

स्पर्धेत 25000 धावपटूंनी आपला सहभाग नोंदवला होता. स्पर्धेतील 21किलोमीटर मॅरेथॉनचा फ्लॅग ऑफ 5.30 वाजता, तर 10किलोमीटर अर्धमॅरेथॉन स्पर्धेचा फ्लॅगऑफ सकाळी 5:45 वाजता झाला. 21किलोमीटर अंतराच्या मॅरेथॉन स्पर्धेसाठी बालेवाडी स्टेडियम ते राधा चौक, बाणेर फाटा, औंध, विशालनगर मार्गे, बालेवाडी हायस्ट्रीट वरून पुन्हा बालेवाडी स्टेडियम असा मार्गक्रमण होता.

स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना करंडक, पदक आणि आकर्षक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मा. नगरसेवक सनी निम्हण, माजी भारतीय हॉकीपटू धनराज पिल्ले, रेस डायरेक्टर यश राईकर, एव्हरेस्टवीर किशोर धनकुडे, संयोजन समिती सचिव चंद्रकांत निम्हण आदी मान्यवर उपस्थित होते.

निकाल: प्रथम, द्वितीय व तृतीय या नुसार:
१०किमी गट:पुरुष:१.धुलदेव घागरे(००.३३.०८से), २.पंकज नेवासे(००.३३.१६से), ३.अभिजीत भस्मे(००.३३.३०से);
१०किमी गट:महिला: १.अर्चना आढाव(००.३९.४७से), २.थीर्धा गोपाकुमार के(००.४०.२२से), ३.निशा पासवान(००.४१.१४से);
२१ किमी गट: पुरुष: १.नागेश कारंडे(०१.११.०९से), २.विकास पोळ(०१.१३.००से), ३.निक्कू ऍथलेट्स(०१.१३.२९से);
२१ किमी गट:महिला:१.राणी मुलचंदानी(०१.२३.२६से), २.शितल तांबे(०१.३९.५७से), ३.साजीनी रोशन(०२.०४.४१से);