May 3, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये बाबुरावजी घोलप महाविद्यालयाची दमदार कामगिरी

सांगवी :

नुकत्याच गुवाहाटी (आसाम) येथे पार पडलेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स स्पर्धेमध्ये सांगवी येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील खेळाडूंनी दमदार कामगिरी करत एकुण *13 पदकांची* लयलूट केली. यामध्ये *भक्ती वाडकर हिने आपल्या सर्वोत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत एकूण 5 पदकांची कमाई केली. यात *मीडल रिले या प्रकारामध्ये सुवर्णपदक, ५०, १०० व २०० बॅक्सट्रोक प्रकारामध्ये रौप्य व फ्री स्टाईल रिलेमध्ये कांस्य* पदकांचा समावेश आहे. तसेच *दीक्षा यादव व शुभम धायगुडे यांनी अनुक्रमे मीडल रिले मध्ये सुवर्ण, 800m फ्री स्टाईल व फ्री स्टाईल रिलेमध्ये कांस्य , फ्री स्टाईल, फ्री स्टाईल रिलेमध्ये कांस्य* पदकावर आपले नाव कोरले. त्याचबरोबर *श्वेता कुराडे हिला फ्री स्टाईल रिलेमध्ये कांस्य पदकावर* समाधान मानावे लागले.

 

खेळाडूंच्या या दैदिप्यमान यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना शाबासकीची थाप दिली. या सर्व खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालिका डॉ. विद्या पाठारे यांचे मार्गदर्शन लाभले.

या कामगिरीबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित दादा पवार, उपाध्यक्ष राजेंद्रजी घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम, खजिनदार अॅड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव ए. एम. जाधव यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले असून सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.