पुणे :
माजी आमदार आणि विद्यमान राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांना ‘संसद महारत्न पुरस्कार’ जाहीर झाला. याबद्दल बाणेर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश तापकीर, वैभव तापकीर, अक्षय तापकीर, पंकज तापकीर, गौरव तापकीर आणि विशाल भगत जयेश तापकीर यांनी डॉ. मेधा कुलकर्णी यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या कार्याचा गौरव करताना बाणेर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश तापकीर म्हणाले, ‘डॉ. मेधा कुलकर्णी यांनी आतापर्यंत बाणेर, बालेवाडी आणि पाषाण भागातील अनेक प्रश्न सोडवले आहेत. त्यांच्या पुढाकाराने अनेक विकासकामे झाली आहेत. त्या नेहमीच सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी कार्यरत असतात, म्हणूनच त्यांच्या कार्याचा गौरव होत आहे, याचा आम्हाला आनंद आहे.’ त्यांनी नेहमीच अडीअडचणी वेळी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत आम्हाला प्रोत्साहित केले आहे.
डॉ. मेधा कुलकर्णी यांना मिळालेला हा पुरस्कार त्यांच्या आतापर्यंतच्या राजकीय आणि सामाजिक कार्याची पोचपावती आहे. जनतेसाठी आणि देशासाठी निष्ठेने काम केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. याचा आम्हाला अभिमान वाटतो असे तापकीर यांनी सांगितले.




























More Stories
बाणेर जलतरण तलावात दीड लाखाचे युनिट साडेनऊ लाखांना? कोथरूडमधील जलतरण तलावांच्या कामात ३८ लाखांच्या खर्चावरून अमोल बालवडकर यांची चौकशीची मागणी
कोथरूड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ९ च्या विकासकामांचा निधी रद्द; राजकीय वैमनस्यातून जनतेच्या कामात खोडा : अमोल बालवडकर
*म्हाळुंगे गावातील रस्ता व ड्रेनेजच्या कामांना गती* *ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत म्हाळुंगे गावच्या शिष्टमंडळाची चर्चा*