बाणेर :
श्रावण महिन्याच्या निमित्ताने, ‘स्वराज्य प्रतिष्ठान’तर्फे बुधवार, ६ ऑगस्ट २०२५ रोजी माजी नगरसेविका सौ. स्वप्नाली प्रल्हाद सायकर आणि स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. प्रल्हाद रामभाऊ सायकर यांच्या वतीने ‘श्रावण महोत्सव’ आणि ‘श्रावण स्नेहभोजन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, या स्नेहभोजनाच्या निमित्ताने सुप्रसिद्ध लेखक देवेंद्र पेम लिखित गाजलेले ‘ऑल दि बेस्ट’ हे नाटक सादर केले जाणार आहे.
कार्यक्रमाचे ठिकाण बंटारा भवन, पुणे-बंगलोर हायवे, मर्सिडीज शोरूम शेजारी, पुणे येथे आहे. स्नेहभोजनाचा कार्यक्रम संध्याकाळी ७ ते १० या वेळेत असणार आहे. याव्यतिरिक्त, ‘ऑल दि बेस्ट’ नाटकाचे दोन प्रयोग आयोजित करण्यात आले आहेत. पहिला प्रयोग दुपारी ४:३० ते ७:३०, तर दुसरा प्रयोग रात्री ८ ते ११ या वेळेत होणार आहे. नाटकाच्या शो पाससाठी इच्छुकांनी आधीच कळवावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
माजी नगरसेविका सौ. स्वप्नाली प्रल्हाद सायकर आणि स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. प्रल्हाद रामभाऊ सायकर यांनी या कार्यक्रमासाठी बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी,सोमेश्वरवाडी, सुस, महाळुंगे परिसरातील नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन केले आहे.


More Stories
*औंध-बोपोडी परिसरात पाच ठिकाणी सार्वजनिक वसुबारस पूजनाचे आयोजन, नगरसेवक सनी विनायक निम्हण यांचे नागरिकांना कुटुंबासह सहभागी होण्याचे आवाहन*
बाणेरच्या ‘रेजेन्सी अस्ट्रा’ प्रकल्पाला स्टॉपवर्क! सर्व्हे नं. ५४ मधील रोहन लेहेर लेआउटच्या अॅमेनिटी स्पेस गैरव्यवहार प्रकरणी महापालिकेची कारवाई*
*प्रसिद्ध डायरेक्ट सेलिंग कंपनी ‘प्रोव्हेदा इंडिया’चा ७ वा वर्धापन दिन पुण्यात दणक्यात संपन्न!*