पुणे:
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून, माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर उपाध्यक्ष राहुल बालवडकर आणि पुणे शहर युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांच्या वतीने सुस येथील पुणे महानगरपालिका मराठी शाळा आणि न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, माजी ग्रामपंचायत सदस्य नितीन चांदेरे, चेअरमन गणेश सुतार, सुखदेव चांदेरे, चंद्रकांत काळभोर, संदीप चांदेरे, विठ्ठल सुतार, प्रभंजन फणसे, तसेच पुणे महानगरपालिका शाळेच्या मुख्याध्यापिका नीता पाटील आणि न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक विश्वासराव सर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे म्हणाले, “विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देणे हे आपले कर्तव्य आहे. अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा एक छोटासा प्रयत्न केला आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळेल.”
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आनंद झाला असून, त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!