सुस , 4 ऑगस्ट, 2025 :
सुस गाव आणि पाषाण-बाणेर भागातील नागरिकांच्या सोयीसाठी आजपासून मोफत वाहन प्रवास सेवा सुरू करण्यात आली आहे. केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री, खासदार श्री. मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन झाले. ही सेवा भाजपचे पुणे शहर उपाध्यक्ष श्री. राहुल कोकाटे आणि सौ. मयुरीताई कोकाटे यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे.
सुस गावातील महादेव नगर, पारखे वस्ती, धनश्री पार्क आणि काळुबाई मंदिर परिसरातील नागरिकांना दैनंदिन कामांसाठी पाषाण आणि बाणेर भागात ये-जा करावी लागते. मात्र, या भागात पुरेशी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नव्हती. ही गरज लक्षात घेऊन श्री. राहुल कोकाटे यांनी ही मोफत सेवा सुरू केली आहे.
उद्घाटनप्रसंगी बोलताना मंत्री श्री. मुरलीधर मोहोळ यांनी भाजप कार्यकर्त्यांनी नेहमीच सामान्य नागरिकांना आवश्यक सोयीसुविधा पुरवण्यावर भर दिला पाहिजे, असे सांगितले. त्यांनी राहुल कोकाटे यांना या भागातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था प्रशासकीय यंत्रणेमार्फत अधिक सक्षम करण्याचे आवाहन केले. तसेच, पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या सुस भागातील रस्ते, वीज, पाणी आणि ड्रेनेज यांसारख्या नागरी समस्यांवर देखील पाठपुरावा करून त्या सोडवाव्यात, असे मत त्यांनी व्यक्त केले.
मुळशी तालुका पंचायत समितीचे मा.अध्यक्ष श्री बाळासाहेब चांदेरे,पुणे शहर भाजप सरचिटणीस पुणीत जोशी, कोथरूड द.मंडल अध्यक्ष लहु बालवडकर, नगरसेविका स्वप्नाली सायकर, नगरसेवक सनी निम्हण, भाजपा नेते प्रल्हाद सायकर, मा.सरपंच नारायण चांदेरे, मा.सरपंच अंजना चांदेरे, भाजप नेते प्रकाश बालवडकर, नितिन कोकाटे, शरद भोते,अनिकेत चांदेरे, सुहास भोते, आबासाहेब सुतार, सचिन पाषाणकर, उत्तम जाधव, सुभाष भोळ, प्रविण आमले, रोहन कोकाटे, सचिन दळवी, दिशा ससार, गौरी चांदेरे, उमाताई गाडगीळ, कल्याणी टोकेकर, अस्मिता करंदीकर यावेळी उपस्थित होते…



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!