October 9, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बालेवाडी येथील कोणार्क सोसायटीमध्ये नागरी समस्यांबाबत राहुल बालवडकर, समीर चांदेरे यांची बैठक, प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न..

बालेवाडी, पुणे :

बालेवाडी येथील कोणार्क सोसायटीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नागरी समस्या समजून घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष समीर चांदेरे आणि पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल दादा बालवडकर यांची विशेष उपस्थिती होती.

 

कोणार्क सोसायटीमधील कमिटी मेंबर्स आणि रहिवाशांशी थेट संवाद साधत त्यांच्या विविध अडचणी व समस्या जाणून घेण्यात आल्या. पाणी पुरवठा, कचरा व्यवस्थापन, रस्त्यांची दुरवस्था, ड्रेनेज लाइन, स्ट्रीट लाईट्स अशा विविध नागरी प्रश्नांवर यावेळी सखोल चर्चा झाली.

बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष मा. श्री. बाबुराव चांदेरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या काळात कोणार्क सोसायटीमधील सर्व प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

रहिवाशांनी या सकारात्मक उपक्रमाचे स्वागत करत समस्यांवर लवकर तोडगा निघेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.