November 14, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर येथील मनपा शाळेत अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त समीर चांदेरे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप..

बाणेर :

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष समीर चांदेरे आणि पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल बालवडकर यांच्या वतीने बाणेर येथील कै. सोपान बाबुराव कटके मनपा शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी सतेज कबड्डी संघाचे अध्यक्ष नासीर तात्या सय्यद, सामाजिक कार्यकर्ते संतोष मामा भुजबळ, आणि राजू चौकिमठ यांची विशेष उपस्थिती होती.

यावेळी बोलताना समीर चांदेरे म्हणाले, “मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणारा हा उपक्रम यशस्वीपणे संपन्न झाल्याबद्दल विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि शाळा प्रशासनाचे आम्ही आभार मानतो.” हा स्तुत्य उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल आदेश देडगे सर यांचे त्यांनी विशेष आभार मानले.

या शैक्षणिक साहित्याच्या वाटपामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. अशा उपक्रमांमुळे गरजू विद्यार्थ्यांना मदत होते, ज्यामुळे त्यांचे शिक्षण अधिक सुलभ होते.