June 18, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सोमेश्वर फाऊंडेशनच्या वतीने ‘सुपर सनीज् विक’ अंतर्गत क्रिकेट स्पर्धेचे माजी भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणे यांच्या हस्ते उद्घाटन करत स्पर्धेला सुरुवात…

औंध :

सोमेश्वर फाऊंडेशनच्या वतीने माजी नगरसेवक सनी निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सुपर सनीज् विक’ अंतर्गत औंध येथे २० ते २५ फेब्रुवारी दरम्यान डे-नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार व स्टार खेळाडू अजिंक्य रहाणे यांच्या हस्ते करण्यात आले.

 

याप्रसंगी अजिंक्य रहाणे यांनी वाढदिवसानिमित्त विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी सोमेश्वर फाऊंडेशनचे अभिनंदन केले. स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंशी हस्तांदोलन करत शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी सिद्धार्थ पिसाळ, सचिन खोपकर, बाबू भोर, गणेश शेलार यांच्यासह सर्व सहकारी, खेळाडू व क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.