May 3, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

औंध येथील रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम मंडळाच्या वतीने शिवजयंती निमित्त मुलांना शिवचरित्र पुस्तकांचे वाटप…

औंध :

औंध येथील रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम मंडळाच्या वतीने शिवजयंती निमित्त श्रीराम संस्कार वर्ग (गोळवलकर गुरुजी शाळा )औंधगाव येथे लहान मुलांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवचरित्र पुस्तके वाटप करण्यात आली. यावेळी मंडळाचे सभासद उपस्थित होते.

 

संस्कार वर्ग माध्यमातुन मुलांना चांगले संस्कार व्हावे यासाठी प्रयत्न केले जातात. आपल्या सर्वांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे संपूर्ण जिवन हे आदर्श दर्शविणारे होते. म्हणुनच शिवचरित्र माध्यमातुन मुलांना संस्कार प्राप्त व्हावे या हेतूने पुस्तके वाटप करण्यात आले.