January 22, 2025

Samrajya Ladha

बाणेर परिसरात ज्येष्ठ नागरिकांची संवाद साधत किशोर शिंदे यांनी केली प्रचार, नागरिकांचा जोरदार प्रतिसाद..

बाणेर :

बाणेर येथील मुरकुटे गार्डन आणि बाणेर टेकडी वरती मनसेचे कोथरूड विधानसभा उमेदवार किशोर शिंदे यांनी नागरिकांच्या आणि वसुंधरा सदस्यांच्या भेटी घेत बाणेर भागातील प्रचार सांगता केली.
विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून नागरिकांच्या भेटी घेत किशोर शिंदे यांनी निवडून आल्यानंतर आपण राबविणारा विविध संकल्पना नागरिकांशी चर्चा करत मांडल्या. मागील निवडणुकीमध्ये कडवी झुंज देणाऱ्या किशोर शिंदे यांच्या बद्दल यावेळी एक वेगळी आस्था नागरिकांमध्ये दिसली.

 

बाणेर बालेवडी परिसरामध्ये अनेक विचारवंत व्यक्तिमत्व पाहायला मिळतात. यांना भेटल्यानंतर त्यांच्या विचारातून नाविन्यपूर्ण गोष्टी शिकायला मिळतात. नागरिकांची मनसेचा उमेदवार म्हणून माझ्याबद्दलचे आस्था पाहून मनाला समाधान लाभले. ह्या विचारवंत नागरिकांच्या आशीर्वाद निश्चितच मला विजयी करतील याची खात्री आहे.
ॲड. किशोर शिंदे
मनसे उमेदवार कोथरूड विधानसभा

यावेळी मनसेचे अनिकेत मुरकुटे, राम गायकवाड, मयूर सुतार, श्रवण खर्डे, किशोर भोपळे, गणेश चव्हाण आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You may have missed