पुणे :
17 नोव्हेंबर पुणे, येथे झालेल्या 4थ त्वायकांदो फॉर ऑल ओपन इंटरक्लब चॅम्पियनशिप 2024 स्पर्धेमध्ये पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज बावधन येथील इयत्ता दुसरीत शिकणारा विद्यार्थी मल्हार दिपक कंधारे याने त्वायकांदो स्पर्धेत पुणे विभागातून सुवर्णपदक पटकावले.
विद्यार्थ्यांना पेरिविंकल स्कूलमध्ये केवळ शिक्षणच नव्हे तर इतर सुप्त गुण वाढीस लागण्यासाठी शाळा नेहमीच प्रयत्नशील असते व तसे प्रोत्साहन मुलांना नेहमीच दिले जाते. विद्यार्थ्यांमधील इतर कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेतील शिक्षक नेहमीच अविरतपणे झटत असतात.
यावेळी चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष व संस्थापक श्री. राजेंद्र बांदल सर व संचालिका सौ. रेखा बांदल व तडफदार संचालिका कु.शिवानी बांदल यांनी मल्हारचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित पर्यवेक्षिका इंदू पाटील, कल्याणी शेळके यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी