August 28, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

राम नदी स्वच्छता अभियानांतर्गत सोमेश्वरवाडी येथे सलग सातव्या वर्षी मोठ्या उत्साहात दीपोत्सव साजरा..

सोमेश्वरवाडी :

राम नदी स्वच्छता अभियानांतर्गत सोमेश्वर वाडी येथे दीपोत्सव साजरा करण्यात आला. सलग सातव्या वर्षी मोठ्या उत्साहात राम नदी स्वच्छता अभियान कार्यकर्त्यांच्या वतीने नागरिकांना सोबत घेऊन सोमेश्वर मंदिर पाठीमागे कुंडावर दीपोत्सव साजरा करण्यात आला.

 

दिवाळी पाडवा निमित्त राम नदी स्वच्छता अभियान कार्यकर्ते आणि नागरिक यांनी एकत्र येऊन परिसर स्वच्छ्ता करत दिवे लावत दीपोत्सव साजरा केला. यावेळी गणेश, गंगा आरती करण्यात आली. तसेच राम नदी स्वच्छता अभियानाची माहिती यावेळी देण्यात आली. संपूर्ण परिसर दीपोत्सव मुळे दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला होता.