September 17, 2024

Samrajya Ladha

सोमेश्वरवाडी गावातील बंद झालेली पीएमपीएल बस सेवा पुन्हा सुरू…

सोमेश्वरवाडी :

सोमेश्वरवाडी गावातील नागरिक आणि शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेली पीएमपीएल बस सेवा आज पासुन पुन्हा सुरु करण्यात आली. ग्रामस्थांनी बसचे पुजन करुण बससेवा सुरू झाल्याचा आनंद व्यक्त केला. कोरोना काळात हि बस सेवा बंद केल्याने नागरीक आणि विध्यार्थी यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.

सोमेश्वरवाडी गावातील नागरीक ग्रामस्थ शाळेतील विद्यार्थी यांची कोरोना काळात बंद झालेली पीएमपीएल ची बस सेवा सुरू व्हावी अशी मागणी सर्वजण करत होते. तसा पाठपुरावा देखील पीएमपीएल प्रशासनाकडे केला होता. पीएमपीएल प्रशासनाने हि मागणी मान्य केली असुन आज पासुन पीएमपीएल ची बस सेवा सोमेश्वरवाडी गावासाठी सूरु करण्यात आली आहे. वारंवार पाठपुरावा केल्याने नागरिकांची अडचण दूर झाली याचे समाधान आहे. ट्रांसपोर्ट मैनेजर सतिशजी गव्हाणे यांनी पुन्हा बस सेवा चालू करुन दिल्या बद्दल त्यांचे मनापासून आभार : सचिन दळवी(सरचटणीस भाजपा कोथरुड विधानसभा)

बस सेवा सकाळी ९.०० वाजता आणि १०.३० वाजता तसेच सायंकाळी ५.३० आणि ७.०० वाजता सुरू राहणार आहे. तरी नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी या बस सेवेचा लाभ घ्यावा.

यावेळी पोपटराव जाधव, चिंतामण दळवी, बाप्पु दगडे तानाजी काकडे, रोहिदास घोलप, दत्तात्रय खुळे, गोरखनाथ दळवी, ज्ञानेश्वर आरगडे, गुलाब जोरे, जगन्नाथ दळवी, चंद्रकांत आरगडे, भरत जोरे, बाळासाहेब येवले, रविंद्र जोरे, संतोष सपकाळ, रामभाऊ जाधव, नथू घोगरे,चंद्रकांत जाधव, व इतर ग्रामस्थांच्या हस्ते बस सेवा शुभारंभ करण्यात आला.