पाषाण :
महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री, तसेच कोथरूड विधानसभेचे लोकप्रिय आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम भाजपा युवा मोर्चा, कोथरूड मतदारसंघाचे अध्यक्ष श्री. रोहन रोहिदास कोकाटे यांच्या पुढाकाराने पाषाण येथे राबविण्यात येत आहे.
या आरोग्य शिबिराचे आयोजन श्री. रोहन रोहिदास कोकाटे जनसंपर्क कार्यालयात, ऑफिस क्रमांक १, शिवांजली हॉटेल शेजारी, पाषाण रोड, पुणे-२१ येथे करण्यात आले असून, नागरिकांना विनामूल्य आरोग्य तपासणीची सुविधा दिली जाणार आहे.
शिबिराचा कालावधी पुढीलप्रमाणे आहे:
गुरुवार, ०६ जून २०२५ — ते शनिवार, ०८ जून २०२५ — सकाळी १० ते सायंकाळी ५
या शिबिरात विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या, प्राथमिक वैद्यकीय सेवा व तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन उपलब्ध असणार आहे. या उपक्रमाचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक श्री. रोहन कोकाटे यांच्याकडून करण्यात आले आहे.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी